आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल खात्याची चौकशी प्रकरण:विखेंना थोडाच वेळ मिळालाय त्यांनी काहीतरी चांगले काम करावे; थोरातांचा विखेंवर पलटवार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नव्या शिंदे-भाजप सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी बोलताना मागील महाविकास आघाडी सरकारमधील महसूल खात्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे संकेत देत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर काही तासातच थोरात यांनी विखेंवर पलटवार करत पाहिजे तेवढ्या चौकशा करा, थोडा काळ मिळालाय काही चांगले कामही करा, असा टोला लगावला.

राजकारणात विखे व थोरात यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते प्रसिद्ध आहे. संधी मिळेल तेथे एकमेकांवर आरोप त्यांच्याकडून होतात. मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपद थोरातांकडे होते. त्यावेळी विरोधात असलेल्या विखेंनी थोरातांच्या कारभारावर सातत्याने टीका करत महसूल खात्याच्या कारभाराची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली होती. आता राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-भाजप सरकार आले आहे. त्यात विखे महसूलमंत्री झाले आहेत. यानंतर त्यांनी थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...