आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्‍हा दुष्‍काळमुक्‍तीसाठी प्रयत्‍न:महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे यांचे आश्वासन; प्रादेशिक नळपाणी पूरवठा योजनेचे भूमीपुजन

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्‍ह्यात पाण्‍याचा प्रश्‍न महत्‍वाचा आहे. आगामी काळात जिल्‍हा दुष्‍काळमुक्‍त करण्‍याचे आपले एकच ध्‍येय असून, दुष्‍काळी भागातील लोकांना पाणी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दुग्‍धविकासमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी बुधवारी (7 सप्टेंबर) ला केले.

अहमदनगर तालुक्‍यातील वाळुंज येथे आयोजित राष्‍ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना साहित्‍य वाटप कार्यक्रम व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बुऱ्हाणनगर येथे 195 कोटी रुपयांच्‍या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्‍या भुमीपुजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे पाटील, भाजपा जिल्‍हाध्यक्ष अरुण मुंढे, प्रतिभा पाचपुते आणि अक्षय कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्‍हणाले, नगर जिल्‍ह्यात दुष्‍काळग्रस्‍त भागात साकळी पाणीपुरवठा योजनेच्‍या माध्‍यमातुन पाणी उपलब्‍ध करून दिले जाईल. बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस या शासनाने मंजुरी दिली असून या योजनेच्‍या माध्‍यमातुन या भागातील नागरीकांचा पाणी प्रश्‍न सुटण्‍यास मदत होईल. येत्‍या काळात जिल्‍ह्याचा विकास आराखडा तयार करण्‍यात येणार असून यामध्‍ये बंद पडलेले उद्योग सुरू करणेबाबत तसेच तरुणांना रोजगार उपलब्‍ध करून देणेबाबत प्रयत्‍न करणार असल्‍याचेही विखे यांनी यावेळी सांगितले.

जनतेच्या मनातील सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रयत्‍नातुन राष्‍ट्रीय वयोश्री योजनेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍ह्यातील गरीब गरजु लोकांना व्‍हील चेअर, कानाची मशिन, चष्‍मा, काठी आदी साहित्‍यांचे वाटप आज करण्‍यात येत आहे. या साहित्‍य वाटपात अहमदनगर जिल्‍हा देशात पहिल्‍या क्रमांकावर आहे. असे त्‍यांनी सांगितले. सध्‍याचे राज्‍य सरकार हे जनतेच्‍या मनातील सरकार असून पुढील अडीच वर्षात जनतेच्‍या विविध अडचणी सोडविणार आहोत असे विखे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...