आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास काम:महसूल मंत्री विखे यांच्या हस्ते सोनगावात विकास कामांचा शुभारंभ

सात्रळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या २८ लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष अंत्रे होते. व्यासपीठावर विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक सुभाष अंत्रे,राजेंद्र अनाप,पाराजी धनवट, मच्छिंद्र अंत्रे.सरपंच अनिल अनाप, उपसरपंच किरण अंत्रे उपस्थित होते.

ग्रामपंचायतच्या निधीतून रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटार स्वच्छता गृह, अंगणवाडी समोर व बाजारपेठेत पेव्हिंग ब्लॉक, पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट आदी कामांचा शुभारंभ पार पडला. सोनगाव ग्रामपंचायत सोनगाव सोसायटी व ग्रामस्थांच्या हस्ते मंत्री विखे यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री विखे पाटील म्हणाले, सोनगावचे सरपंच उपसरपंच व सर्वच सदस्यांचे चांगले काम सुरू आहे. यापुढे हवी ती मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या वेळी विनोद अंत्रे, नारायण धनवट, मोहम्मद तांबोळी, दिलीप अंत्रे, संदीप अनाप, दत्तात्रय अंत्रे, प्रशांत अंत्रे, शरद अंत्रे, एजाज तांबोळी, चंद्रभान अनाप, सयाजी अनाप उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...