आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:देशभक्तीपर गीतांनी क्रांतिवीर; शहिदांना मानवंदना

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव येथे महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाभिमान जागृत करणारी देशभक्तीपर गीतांनी क्रांतिवीर, शहिदांना मानवंदना देण्यात आली.

विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा खिस्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व संस्थाचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक महेश गुंड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. चाैथी, सहावी, सातवी, अाठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी विविध कवायत प्रकार गीतांवर सादर केले. त्यांना राजश्री वायभासे, भारती गुंड, जयश्री कोतकर, सोनल कुमावत यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, सचिव बबनराव कोतकर, सहसचिव रावसाहेब सातपुते, मुख्याध्यापिका वासंती धुमाळ, यांनी सर्वांचे कौतूक केले. सुत्रसंचालन जालिंदर सातपुते यांनी, तर अाभार मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...