आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवले म्‍हणाले की:राज्य सरकारमध्ये रिपाइंला मंत्रिपद मिळेल,मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नव्या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद व राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एक आमदारकी, तसेच दोन-तीन महामंडळांवर अध्यक्षपद मिळावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. मंत्रिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विस्तारात विचार करण्याची ग्वाहीही फडणवीस यांनी दिली आहे. पुन्हा एकदा त्यांना भेटून ही मागणी करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नगर येथे सांगितले.

आठवले म्हणाले, सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना व भाजपला मतदान केले होते. परंतु निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसला साथ देणे पसंत केले त्यांच्या या ‘डेंजर’ निर्णयाने त्यांच्यावर आज पश्चात्तापाची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे, असा दावाही त्यांनी केला.

गडकरींना मोठी जबाबदारी मिळेल: नितीन गडकरी हे देशातील मोठे नेते आहेत. भाजपने त्यांना दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. देशभरात रस्त्यांचे उत्कृष्ट जाळे निर्माण करून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत राज्यातून एकच नाव द्यायचे असते. त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्याने गडकरींचे कट झाले असावे, असे रामदास आठवले म्हणाले. मात्र, गडकरी यांना यापेक्षाही मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...