आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइंचे काम; रिपाइंचे शहराध्यक्ष म्हस्के यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्यायाला वाचा फोडून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइं कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचा संघर्ष सुरु आहे, असे प्रतिपादन आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात सामाजिक कार्यकर्ते जमीर मीर सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शहराध्यक्ष म्हस्के यांनी सय्यद व इतर कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार केला.

यावेळी आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, निजाम शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, सचिन शिंदे, नईम शेख, जमीर इनामदार, अजीम खान, बंटी बागवान, जावेद सय्यद, दिनेश पाडळे, सुफियांन शेख, हुसेन चौधरी, आदिल शेख, सोहेल शेख, अनिकेत भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष म्हस्के म्हणाले, डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सुरु आहे. जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...