आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी क्लब:संगमनेर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ऋषिकेश मोंढे, सचिवपदी  हासे

संगमने11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ररोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी उद्योजक ऋषिकेश मोंढे, सचिवपदी आनंद हासे तर खजिनदारपदी विश्वनाथ मालाणी यांची निवड करण्यात आली. सन २०२२-२३ नूतन पदाधिकाऱ्यांचा रविवारी बाफना हॉल कॉलेज येथे सायंकाळी ५.३० वाजता पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादचे रोटरी डिस्ट्रीक्टचे गव्हर्नर रुक्मेश जखोटीया, गव्हर्नर ईलेक्ट स्वाती हेरकळ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गा तांबे उपस्थित राहणार आहेत. १९८४ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लबने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाचा ठसा उमटविला. क्लब ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोरोनात पती गमावलेल्या महिलांना १११ कमर्शिअल आटा चक्की तसेच ६१ शिलाई मशीन क्लबतर्फे देण्यात आले. २ वर्षात सुमारे २ हजार मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करून ती जगविण्याचे काम केले.

रोटरी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून १९८९ पासून २५ हजारांवर मोफत मोतिबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया करुन मोठे काम उभे केले. क्लबच्या उपाध्यक्ष महेश वाकचौरे,सहसेक्रेटरी डॉ. किशोर पोखरकर, योगेश गाडे, अमित पवार, दिलीप मालपाणी, संजय राठी, रवि पवार, दीपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, सुनील कडलग, मधुसुदन करवा, संजय कर्पे, ओंकार सोमाणी, डॉ. विकास करंजेकर, सुनिल घुले, डॉ. प्रमोद राजुस्कर, प्रमोद मणियार, मोहित मंडलिक, मयूर मेहता, संकेत काजळे आदींची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...