आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोल्हेगाव-नागापूर हा परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात होता. स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी नेहमीच विकासकामाच्या निधीसाठी पाठपुरावा केला असल्याने या भागाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला. सभापती कुमारसिंह वाकळे हे नियोजनबद्ध, दर्जेदार व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावले असल्यामुळे बोल्हेगाव-नागापूर भागाला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून व आमदार अरुण जगताप यांच्या विकास निधीतून बोल्हेगाव राघवेंद्रनगर येथील रस्ता डांबरीकरण कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इंद्रभान वर्पे, बाबासाहेब शिंदे, एकनाथ वैराळ, रघुनाथ काळे, किसन जिवडे, शैलेश धरम, मच्छिंद्र सातपुते, किरण खरात, अरुण शिंदे, मयूर उकांडे, राहुल गाडेकर, पांडुरंग थोरवे, शिवम ढमके, अशोक ताकवाले, अमोल देशमुख, केशव धुमाळ, अर्जुन रोकडे, अशोक चासकर, प्रदीप शेळके, अरुण रेपाळे, विशाल कारंजकर, सुनील भालेराव, रमेश वाकळे, विकी तिवारी, दिलीप राख तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे म्हणले, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बोल्हेगाव-नागापूर परिसरातील विकासकामांना गती आली. विकास कामासाठी जेव्हा-जेव्हा मी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा करतो, तेव्हा-तेव्हा मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला. विकास कामे करत असताना दर्जेदार कामे व्हावी याकडे विशेष लक्ष दिले जाते. एकदा केलेले विकास काम पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेतली जाते भविष्यकाळातही अशाच विकासकामांची गंगा चालू राहील, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.