आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सिव्हील हडकोतील रस्त्याची दूरवस्था

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हील हडको परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या काही वर्षांत येथील प्रमुख रस्त्याचे काम झालेले नाही. संपूर्ण शहरात खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हडकोतील एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही.

येथील रस्त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, अद्यापही या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, तारकपूर ते गंगा उद्यानपर्यंत रस्त्याचे कामही रखडले आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले असून नाल्यावरील पुलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...