आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची मोठी दुरावस्था:ख्रिस्त गल्ली व जैन मंदिर परिसरात रस्त्याच्या पॅचिंग कामाला सुरवात

नगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या गावठाण भागातील भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली व त्यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. जमिनी अंतर्गत असलेली कामे करणे हे महत्त्वाचे काम होते. ही सर्व कामे आता मार्गी लागल्यानंतर जुन्या गावठाण भागातील रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. ख्रिस्त गल्ली ते जैन मंदिर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. चातुर्मास सुरू असल्यामुळे जैन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

मंदिर परिसरातील रस्ते खराब असल्यामुळे त्यांना विविध प्रश्नाला सामोरे जावे लागत आहेत हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. ख्रिस्त गल्ली व परदेशी गल्ली परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे हा प्रश्न संदर्भात मागणी केली असता हा प्रश्न मार्गी लागला व पॅचिंगच्या कामाला सुरुवात झाली. या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार उपस्थित होते.