आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:रोड रोमिओ चा मुलींना त्रास, मुलींमध्ये भीतीचे वातावरण ; दुचाकीद्वारे पाठलाग करून छेड काढतात

शेवगाव शहर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव येथे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी येतात. रोडरोमिओ विद्यार्थिनींचा पाठलाग करण्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहरातील विद्या नगर ते काकडे हायस्कूल दरम्यान घडल्या आहेत. विद्यानगर, लक्ष्मीनगर, न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल या परिसरात दहावी,बारावी, सीईटी आदी खासगी ट्युशनचे वर्ग चालवले जातात. याचाच फायदा घेत काही टवाळखोर रोडरोमिओ या मुलींचा आपल्या दुचाकीद्वारे पाठलाग करून छेड काढतात. भीतीपोटी कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याने या रोडरोमिओंचा बंदोबस्त कोण करणार असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष साबळे यांनी केली आहे. रोडरोमिओंचा बंदोबस्त झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साबळे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...