आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वसामान्य कुटुंबातून वर येत मला जनतेच्या आशीर्वादानेच स्थायी समितीचे सभापतिपद मिळाले आहे. मिळालेल्या संधीचे सोनं करत नगर शहराच्या विकासात भर पडेल असेच काम करणार आहे. नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत नागरिक आता जाहीरपणे बोलू लागले आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे कामे सुरु झाली आहे. मार्च अखेरीस सर्व रस्ते डांबराने गुळगुळीत झालेले दिसतील.
सभा पती म्हणून पहिल्याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, नगरच्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत होतील, असे कामे करणार आहे,असे अाश्वासन मनपा स्थायी समितीचे नूतन सभा पती गणेश कवडे यांनी दिले. तेलीखुंट येथे लोढा परिवाराच्या वतीने मर्चंट बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा व स्थायी समितीचे नूतन सभा पती कवडे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कवडे बोलत होते. यावेळी मर्चंट बँकेचे नूतन संचालक आनंदराम मुनोत, संजय गांधी, प्रमिला बोरा, मीना मुनोत, संजय चोपडा, मोहन बरमेचा, संजय बोरा, विजय कोथिंबीरे, सुभाष बायड, कमलेश भंडारी तसेच शहर बँकेचे नूतन संचालक निखील नहार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, पोपट लोढा, प्रमोद सोलंकी, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.
वसंत लोढा म्हणाले, नगरच्या उद्योग क्षेत्राला, बाजारपेठेला व व्यापाऱ्यांना मर्चंट बँकेचे मोठे सहकार्य आहे. पारदर्शी कामामुळे मर्चंट बँकेत उत्तम बँकिंग होत असल्याने सभासदांचा विश्वास सत्ताधारी जनसेवा मंडळाने जिंकला आहे. सभा पती गणेश कवडे यांना कमी कालावधी मिळला आहे. या संधीचे सोनं करत त्यांनी थांबलेल्या शहर विकासास चालना द्यावी. विकासाच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप होवू देवू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.