आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:गाय व्यापाऱ्याला 73 हजाराला लुटले; शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली

श्रीरामपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी येथून गाईंची विक्री करून घरी जाणाऱ्या एका व्यापाऱ्यास मारहाण करून भरदिवसा लुटण्यात आल्याची घटना नेवासा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी व्यापारी बालम हसन पठाण (वय २८, रा. कारेगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

गाईंच्या विक्रीचे ७३ हजार रुपये घेऊन व्यापारी पठाण हे कारेगावला चालले होते. दुपारी १ वाजेच्या दरम्यान उड्डाणपुलाजवळून शेती महामंडळाच्या शेतातील रस्त्यावरून ते निघाले असता दोन दुचाकीवर काही इसम आले. त्यांनी प्रथम पठाण यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर गाडी अडवून वाद घातला. पठाण यांना मारहाण सुरू केली व ७३ हजार रुपयाची रोकड पळवली.