आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचा डान्स पाहिला का ?:कोरोनाग्रस्तांसोबत आमदार रोहित पवारांचा 'झिंगाट' डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकास्त्र

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातून रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलहोत आहे. या डान्सचं अनेकांकडून कौतुक होत आहे.

रोहित पवारांचा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्ज तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांचे मनोबल वाढावण्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात रोहित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाचा स्वतः रोहत पवार यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहीले की, 'गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो.'

शरद पवारांच्या नातवासाठी वेगळा न्याय का ?

दरम्यान, रोहित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'रोहित पवारांनी एका कोविड सेंटरमध्ये जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला. कोणतेही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का ?' असा सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...