आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक निवडणूक:रोहकलेंनी केले सोयऱ्या-धायऱ्याचे राजकारण; राजेंद्र शिंदे यांचा आरोप

जामखेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना गोड बोलून विकास मंडळाच्या नावाखाली १३ कोटी रुपये माजी चेअरमन रावसाहेब रोहकले यांनी जमा केले. बांधकाम अपूर्ण अवस्थेत ठेवले. त्यांचे मंडळ फक्त सोयरे धायरे यांचे आहे. त्यांच्या स्वच्छ चेहऱ्याला भूलून जाऊ नये, या निवडणुकीत त्यांना घरी बसवा, असा आरोप सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे यांनी येथील जिल्हा सदिच्छा मंडळाचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केला.

सदिच्छा मंडळ जामखेडचा शिक्षक बँक व विकास मंडळ उमेदवारी चाचपणी मेळावा रविवारी उत्साहात झाला. यावेळी नेते राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, जिल्हा संघाचे अध्यक्ष माधव हासे, उच्चाधिकार समितीने अध्यक्ष गजानन ढवळे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नारायण राऊत, शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन गहिनीनाथ शिरसाठ, जिल्हा संघाचे सरचिटणीस बबन गाडेकर, राजेंद्र कुदनर, कैलास वर्पे, उध्दव दौड, कल्याण कराड, धर्माजी बडे, शरद राऊत, प्रदीप शेलार, संजय पवार, महादेव गांगर्डे, उद्धव थोरात, गुलाब गावडे, अशोक कुसळकर आदी उपस्थित होते. उमेदवार चाचपणी मेळाव्यात शिक्षक बँकेच्या उमेदवारीसाठी ११ सभासदांनी उमेदवारी मागून मंडळ अभेद्य आणि मजबूत आहे, असा विश्वास तालुक्याला बँकेचे माजी अध्यक्ष नारायण राऊत यांनी दिला.

यावेळी बाळासाहेब मोरे, केशव कोल्हे, ज्ञानेश्वर कोळेकर, रजनीकांत साखरे, नितीन मोहळकर, अर्चना भोसले, नीलेश बोराडे, सिंधू अंधारे, संतोष भोंडवे, अर्जुन घोलप, मंजूषा सोले, अमोल पवार, अविनाश नवसरे, मल्हारी पाखरे यांनी मुलाखती दिल्या. शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे, तालुकाध्यक्ष संतोष भोंडवे, अर्चना भोसले, अर्जुन घोलप, सिद्धनाथ कचरे, केशव कोल्हे, ज्ञानेश्वर कोळेकर, किरण गोरे, अमोल पवार, किशोर नवसरे, रजनीकांत साखरे, उपेंद्र आढाव, नितीन मोहळकर तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष कामिनी राजगुरू उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...