आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धांचे आयोजन:जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय

कोपरगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात १४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील विद्यार्थी तेजस मधुकर कोते याने १९ वर्षाखालील मुलांच्या गटात व पालक योगेश गंगवाल या विद्यार्थिनीने मुलींच्या गटात तलवारबाजी स्पर्धेतील ईपी या प्रकारात विजय मिळवला.

दोन्ही विजयी खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ. सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...