आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिनाचा परिणाम:गुलाबाची फुले महागली; अहमदनगरमध्ये एका फुलाची किंमत 20 ते 25 रुपयांवर

बंडू पवार ।अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सततच्या पावसामुळे बागातील गुलाबाची फुले सडल्याने आवक मंदावली; गणेशोत्सव, गौरीमुळे बाजारातून मागणी वाढल्याने भावावर परिणाम

गणेशोत्सव व गौरी गणपतीमुळे गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली आहे. त्यात आज शिक्षक दिन असल्यामुळे गुलाबाच्या मागणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे गुलाबाच्या फुलांचे भाव कडाडले आहेत. आज अहमदनगरमध्ये गुलाबाचे एक फुल 20 ते 25 रुपये दराने विकले गेले.

पावसामुळे बागांवर परिणाम

गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम गुलाबाच्या बागांवर झाला आहे. सततच्या पावसामुळे झाडावरील गुलाबाची फुले सडू लागल्याने फुलांची बाजारात आवक मंदावली आहे, दुसरीकडे, सण- उत्सवामुळे मात्र गुलाबाची मागणी वाढली आहे. अहमदनगरमध्ये गुलाबाचे एक फुल 20 ते 25 रुपये दराने विकली जात आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात बाजारात गुलाबाची आवक वाढवूनही मागणी नव्हती.

नगरमधून मुंबई, पुण्याला फुले

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या पारनेर व अन्य तालुक्यांत गुलाबाच्या बागा आहेत. या तालुक्यांतून अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह मुंबई, पुणे या शहरात गुलाबाची फुले विक्रीसाठी जातात. अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुल मार्केटमध्येदेखील दररोज मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते.

आवक मंदावली

गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सतत पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसाचा मोठा परिणाम फुल शेतीवर झाला आहे. पावसामुळे फुल शेतीतील गुलाबाची फुले सडू लागली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह किरकोळ बाजारात गुलाबाच्या फुलाची आवक प्रचंड मंदावली आहे. रविवारी किरकोळ व मोठ्या फुल व्यावसायिकांनी तपोवन रोडवरील गुलाबाच्या शेतीतून 40 रुपये डझनने फुले खरेदी केली होती

गुरुजनांना देण्यासाठी हवंय फुल

5 सप्टेंबर हा सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज शिक्षक दिनानिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थी गुलाबांची फुले घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

सततच्या पावसामुळे बागेतील गुलाबांची फुले सडू लागली आहेत.
सततच्या पावसामुळे बागेतील गुलाबांची फुले सडू लागली आहेत.
बातम्या आणखी आहेत...