आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूट मार्च:कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शेवगाव तालुक्यात चार गावांमध्ये रूट मार्च

शेवगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यात होत असलेल्या बारा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गावामध्ये शांततारा हवी म्हणून शेवगाव पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने निवडणूक असलेल्या गावांमध्ये रूट मार्च काढून शांततेचे आवाहन केले शेवगाव तालुक्यातील बारा ग्रामपंचायत साठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता निवडणूक काळात गावची शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी जबाबदारी पोलीस प्रशासना समोर निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पथकासह निवडणूक सुरू असलेल्या गावांमधून रोड मार्च काढत शांततेचे आवाहन केले. काल सकाळी अमरापूर वाघोली दहिगावणे आखेगाव या मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये फौज फाट्यास रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चमध्ये आरसीसीपी प्लॅटिन व शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी गावातील ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने नागरिकांमध्ये वचक बसावा कोणीही कायदा हातात घेऊ नये याकरिता रूट मार्च घेतला तसेच कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या. या रूट मार्च साठी आरसीपी प्लांटुन पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यासह १७ अंमलदार हजर होते तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अधिकारी व २२ कर्मचारी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...