आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रुबरू’ सोहळा:‘दिव्य मराठी’तर्फे रविवारी भिस्तबाग परिसरात ‘रुबरू’ ; गोष्ट तुमची अन‌् तुमच्या वॉर्डाची’ या उपक्रमाचे आयोजन

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख समस्या व मुद्द्यांबाबत अहमदनगरकरांचा आवाज म्हणून दैनिक दिव्य मराठीने एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून नेहमीच प्रभावीपणे विषय मांडलेले आहेत. हेच सामाजिक भान जपत पुन्हा एकदा शहरातील याच प्रमुख मुद्द्यांबाबत शहरातील जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे १९ जूनपासून दर रविवारी ‘रूबरू... गोष्ट तुमची अन‌् तुमच्या वॉर्डाची’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात दर रविवारी दिव्य मराठीची टीम तुमच्या प्रभागात/ वॉर्डात येऊन परिसरातील समस्या तुमच्याकडून जाणून घेणार आहे. इतकेच नव्हे तर मनपाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींसमोर समस्या मांडून त्याचा पाठपुरावा करणार आहे. पहिला ‘रूबरू’ १९ जून रोजी सकाळी १० वाजता भिस्तबाग परिसरातील नंदनवन नगर येथील विठ्ठल मंदिर येथे आयोजित केला आहे. स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेता अशोक बडे, डॉ. सागर बोरुडे, दीपाली बारस्कर, मीना चव्हाण, रुपाली वारे, संध्या पवार, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून प्रभागातील समस्या मांडाव्यात ‘दिव्य मराठी’तून त्या प्रकाशित केल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...