आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथॉन:अगस्ती महाविद्यालयात एनसीसीच्या वतीने रन फॉर नॅशनल युनिटी मॅरेथॉन उत्साहात

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येथील अगस्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सब युनिटच्या वतीने रन फॉर नॅशनल युनिटी मॅरेथॉन (एकता दौड) उत्साहात झाली. सोमवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी ९ किलोमीटर अंतरावरील मॅरेथॉनचे नियोजन एनसीसीच्या वतीने उत्साहात करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार अगस्ति महाविद्यालयात एकता दौडचे आयोजन करण्यात आले.

ही मॅरेथॉन अगस्ती महाविद्यालय, तहसीलदार कार्यालय व तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, एनसीसी युनिट प्रमुख लेफ्टनंट प्रा. सचिन पलांडे यांनी एकता दौडच्या पार्श्‍वभूमीवर भूमिका विशद केली. याप्रसंगी तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसीलदार माळवे, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, गटविकास अधिकारी राहुल शेळके, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्रा. पलांडे सचिन, अहमदनगरचे विभागीय एनसीसीचे अधिकारी, उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...