आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्पष्टीकरण:राजकीय हेतूने नव्हे लोकशाही मार्गाने प्रशासकाची निवड होण्यासाठी निर्णय, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचे अण्णा हजारेंना पत्र

पारनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासक नेमण्याची कृती घटनाविरोधी असल्याचा अण्णा हजारेंनी केला होता आरोप

७३ वी घटनादुरुस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा, यासाठी शासनाला ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामागे कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही. लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यक्षम व्यक्तीची निवड करावी, ही अपेक्षा असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सोमवारी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रशासक नेमण्याची कृती घटनाविरोधी असल्याचा आरोप करून हजारेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. मुश्रीफ यांनी त्याची दखल घेत भूमिका स्पष्ट केली. सरपंचावर अविश्वास ठराव येऊन सर्वांनी राजीनामे दिले, किंवा न्यायालयाने निवडणूक बेकायदेशीर ठरवली तर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे, असे त्यांनी नमूद केले.

अण्णा हजारे यांनी यांनी मार्गदर्शन करावे

नगरचा पालकमंत्री झाल्यानंतर हजारे यांची भेट ठरवली होती. मात्र, तब्येत ठीक नसल्याने ती होऊ शकली नाही. हजारे यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. ते देतील त्या वेळी राळेगणसिद्धीत येऊन आपण चर्चा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे.