आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Rural Hospital Support For General Patients; Dr. Pranoti Jagtap's Statement, Inspection Of The Entire Hospital Along With Medical Officers And Health Workers | Marathi News

प्रतिपादन:सर्वसामान्य रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयाचा आधार; डॉ. प्रणोती जगताप यांचे प्रतिपादन, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सोबत घेत पूर्ण रुग्णालयाची पाहणी

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण रुग्णालय म्हणजे आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी मोठा आधार आहे, असे प्रतिपादन कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी साखर कारखान्याच्या संचालिका व ओम गुरुदेव महिला ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रणोती जगताप यांनी केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सोबत घेत पूर्ण रुग्णालयाची पाहणी त्यांनी पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयातील अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, एक्स-रे कक्ष, शस्त्रक्रिया गृह, प्रसूतिगृह, नवजात शिशु उपचार कक्ष व समर्पित कोवीड केअर सेंटर या सर्व विभागांना भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याकडून डॉ. जगताप यांनी माहिती घेतली. त्यांनी रुग्णांशी देखील संवाद साधला. दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणेबाबत सूचना दिल्या. तसेच वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक ही रिक्त पदे भरणेबाबत आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत सांगितले. अद्ययावत सुविधांसह ५० बेडबाबत चर्चा व पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे, एक्स रे टेक्नीशियन धनंजय भागवत, स्टाफ नर्स महाजन आणि सस्तारे सिस्टर, शिपाई विकास तरटे, दत्तात्रय मेटे, काझी मावशी, ऑफिस स्टाफ संदीप वाघ तसेच नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पोटे, राजू मोटे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, दैवत जाधव, सागर बोरुडे, कालिदास जगताप, सुशीलकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...