आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर:‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार प्रदान

संगमनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी मजबूत तर देश मजबूत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचे संगमनेरमध्ये प्रतिपादन

रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे. त्यासाठी जैविक शेती महत्त्वाची आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लादलेले जाचक कृषी कायदे रद्द करून केंद्राने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. शेतकरी मजबूत तर देश मजबूत होईल, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी येथे केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात बघेल बोलत होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांना, तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले आणि सहकारातील कार्यकर्ता पुरस्काराने अ‍ॅड. माधवराव कानवडे यांना या वेळी गौरवण्यात आले.

‘भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ संजय आवटे यांच्यापूर्वी सा. रे. पाटील, भानू काळे, डॉ. हमीद - मुक्ता दाभोलकर यांना मिळाला आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार असून, एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, सहकारमहर्षी थोरातांचा वारसा बाळासाहेब थोरात सांभाळत आहेत. वळण बंधाऱ्यांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, संपादक संजय आवटे यांनी पुरोगामी विचार कायम जोपासला. रणजितसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला, तर माधवराव कानवडे यांच्या कार्यकाळात झालेल्या नवा कारखाना निर्मितीचा निर्णय ऐतिहासिक ठरला. केंद्र शेतकऱ्यांना वेठीस धरून कोणाला ताकद देत आहे, ही काळजी घ्यावी लागणार असल्याचे थोरात म्हणाले. ग्लोबल टिचर शिक्षक रणजित डिसले व अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी मनाेगत व्यक्त केले. या वेळी लहू कानडे, डॉ. किरण लहामटे, नरेंद्र घुले, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राजेश मालपाणी, अमित पंडित, आबासाहेब थोरात, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, प्रतापराव ओहोळ, लक्ष्मण कुटे, विजयअण्णा बोराडे, उत्कर्षा रूपवते, प्रा. केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, इंद्रजित थोरात, सेवा दलाचे विलास औताडे, शंकरराव खेमनर, सभापती मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, जगन्नाथ घुगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. तांबेंनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर प्रतापराव ओहोळ यांनी आभार मानले.

भाऊसाहेब थोरातांनी सर्वसामान्य माणसाला नेहमीच केंद्रबिंदू मानले : संजय अावटे

संजय आवटे म्हणाले, देशात “चंपारण्य’चे जे महत्त्व आहे, ते महाराष्ट्रात ‘दंडकारण्य’चे आहे. सर्वसमावेशकता, सहिष्णुता, सहकार्य, सामंजस्य या सकारात्मक पायावर इथे सहकार उभा राहिला. भाऊसाहेब थोरात यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानले. आज लोकशाही धोक्यात आहे. शेतकरी आंदोलनावरील सरकारचा प्रतिसाद हा त्याचा पुरावा आहे. अमेरिकेत लोकशाहीची नाचक्की झाली हे खरे; पण संविधानिक संस्थांनी त्यांची चौकट मोडली नाही. भारतात संविधानिक मार्गाने संविधानाची पायमल्ली होऊ शकते. हा धोका ओळखून “आम्ही भारताचे लोक’ सजग होणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...