आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी:ओझर खुर्द, औरंगपूर व खळी सोसायटीत सहमती एक्सप्रेस ; तर 13 आमदार विखे गटाकड

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील शिर्डी मतदार संघाला जोडलेल्या २६ गावांच्या सेवा सोसायटीच्या निवडणूकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने १० सोसायट्यांवर र्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आमदार राधाकृष्‍ण वि‍खे यांच्‍या जनसेवा मंडळाने १३ सोसायट्या ताब्यात घेतल्या असून ओझर खुर्द, औरंगपूर व खळी सोसायटीत सहमती एक्सप्रेस धावणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया म्हणून सेवा सोसायट्यांकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या या संस्‍थांवर गावपातळीवर वर्चस्वासाठी लढाई सुरु असते. आमदार विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदार संघात संगमनेर तालुक्यातील २६ सहकारी सोसायट्या मोडतात. कोरोनामुळे दोन वर्षे लांबलेल्या या निवडणूकांसाठी मोठी उत्सुकता होती. जिल्हा बँक निवडणुकीत सोसायट्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकत्याच पार पडलेल्या सोसायटी निवडणुकात २६ पैकी हंगेवाडी, निबांळे, जोर्वे, रहिमपूर, मनोली, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक, पानोडी व पिंप्रीलौकी अजमपूर या १० सोसायट्यांच्या माध्यमातून मंत्री थोरात यांनी आश्वी व जोर्वे जिल्हापरिषद गटात आपली ताकद दाखवून दिली आहे. आमदार विखे यांच्या जनसेवा मंडळाने आश्वी बुद्रुक व खुर्द, शेडगांव, शिबलापूर, सादतपूर, झरेकाठी, प्रतापपूर, चणेगाव, निमगावजाळी, दाढ खुर्द, चिंचपूर, उंबरी बाळापूर, कोल्‍हेवाडी या संस्था ताब्यात घेतल्या. आश्वी बुद्रुक सोसायटीची आगामी काळात आमदार विखे यांना डोखेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. तर उर्वरित संगमनेर तालुक्यातील सर्वच सेवा सोसायट्यांवर मंत्री थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात व आमदार विखे यांचा सहकारी संस्‍थाच्‍या माध्‍यमातून नागरीकाशी संवाद कायम राहीला. दोन्ही गटाचे कडवे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळणार, हे निश्चित.

बातम्या आणखी आहेत...