आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हास्तरीय हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धेत साई एंजल्स स्कूलला तीन सुवर्ण व सहा रौप्य पदके मिळाली. वाडिया पार्क येथील मैदानावर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. तसेच नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली.
१४ वर्षाखालील तायक्वांदो गटात वेणु सोमाणी हिला सुवर्ण पदक मिळाले. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वृंदा सोमाणी आणि समृद्धी कारंडे या दोघींना रौप्य पदक मिळाले असून, त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. कराटे क्रीडा प्रकारात समृद्धी कारंडे हिने सुवर्णपदक पटकावले असून, तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच गटात सुलतान शेख यास रौप्यपदक मिळाले आहे. आर्चरी या क्रीडा प्रकारात ५० मीटर कंपाउंड राउंडमध्ये पवन निमसे या विद्यार्थ्यास सुवर्णपदक मिळाले. मॉडर्न पँथेलॉन म्हणजे २०० मीटर व १२०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत शौर्य शेळके यांनी रौप्यपदक पटकावले. त्याची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतही साई एंजल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे जिंकली. ९ वर्षाखालील राज्यस्तरीय आर्चरी चॅम्पियनमध्ये राजवीर काशीद यांनी रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र व गोवा राज्यात झालेल्या सीबीएससी क्लस्टर क्रीडा स्पर्धेत अथलेटिक्समध्ये शौर्य शेळके यांने आठशे मीटर धावणे प्रकारात सहावा क्रमांक पटकावला, तर लांब उडी प्रकारात आर्यन वायदंडे यांनी चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.
या खेळाडूंना मुख्याध्यापक नॅन्सी कोल, उपमुख्याध्यापक मल्लिकार्जुन, क्रीडा शिक्षक जगदीश देशमुख, वैभव आव्हाड, स्वप्नील मेहत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
साईनी विधी राज्याचे नेतृत्व करणार
साई एंजल स्कूलची विद्यार्थिनी असणारी साईनी विधी ही योनेक्स सनराईज डॉ. अखिलेश दासगुप्ता मेमोरियल मिनी नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. नोएडा येथे ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.