आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Sai Baba | Shirdi | Marathi News | 500 And 1000 Rupees Of The Banned Currency Of 3 Crores Climbed In Sai Baba's Court, Help Sought From The Ministry Of Home Affairs

साई बाबांच्या दानपेटीत जुन्या नोटा:साईबाबांच्या दानपेटीत तीन कोटींच्या बंद चलनातील नोटा; भाविकांनी दान केले जुन्या 500 आणि 1000 च्या नोट्या

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांच्या मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत भक्त दररोज लाखो रुपये अर्पण करतात आणि 
 ते पैसे आठवड्यातून एकदा मोजले जातात. - Divya Marathi
साईबाबांच्या मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत भक्त दररोज लाखो रुपये अर्पण करतात आणि ते पैसे आठवड्यातून एकदा मोजले जातात.

शिर्डीच्या साईबाबा दरबारात एक विचित्र घटना घडली आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी दानाच्या स्वरुपात जुन्या बंद पडलेल्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत. नोटबंदीला पाच वर्ष होत आली असताना देखील साईबाबाच्या दरबारात काही दानशुरांनी बंद पडलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टाकल्या आहेत. मंदीराच्या दानपेटीत या नोट्या थोड्या थिटक्या नसुन चक्क तीन कोटी इतके आहे.

देशातून काळा धन हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटांना बँकेत बदल्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र पाच वर्षांनंतर साई दरबारात तीन कोटी रुपयांच्या नोट्या आढळल्या आहेत.

साई संस्थानचे मठ अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबांच्या दानपेटीत जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या नोट्या आढळल्या आहेत. जुन्या बंद पडलेल्या नोट्यांना स्वत:जवळ बाळगणे हे आता गुन्हा झाला असून, त्या कारणानेच काही जणांना आपल्या जुन्या नोट्या साई बाबांच्या दानपेटीत टाकले आहे.

साई संस्थान आठवड्यातून एकदा दान केलेल्या पैशाची मोजणी करते.
साई संस्थान आठवड्यातून एकदा दान केलेल्या पैशाची मोजणी करते.

जुन्या नोटा दानपेटीत टाकण्याचे प्रमाण वाढले
साईबाबा संस्थानच्या प्रमुख भाग्यश्री बनायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी दानपेटीत पैसे टाकल्यानंतर त्या पैशांची मोजणी आठड्याच्या शेवटी होत असते. देशात नोटबंदी झाल्यापासून बाबांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात जुन्या बंद पडलेल्या नोटा येत आहेत. त्या नोटांना आम्ही जमा करुन वेगळे ठेवत आहोत. या नोट्यांची माहिती आम्ही केंद्रीय वित्त मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरबीआयला दिली आहे. असे भाग्यश्री बनायत यांनी सांगितले.

आरबीआय मदत करण्यास तयार
भाग्यश्री बानायत पुढे म्हणाल्या की, "गेल्या आठवड्यात गृह मंत्रालयाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सांगितले की आरबीआय आम्हाला या संदर्भात मदत करेल. त्यानंतर आम्ही आरबीआयच्या सतत संपर्कात आहोत आणि आम्हाला आशा आहे की ते लवकरच आम्हाला काही उपाय सांगतील.

हा पैसा जनतेच्या भल्यासाठी वापरला जाईल
भाग्यश्री बानायत यांनी सांगितले की, नोटबंदीनंतर लगेच म्हणजेच 31 डिसेंबर 2016 पर्यंत दररोज दानपेट्या उघडल्या जात होत्या आणि दान केलेले पैसे बँकांमध्ये जमा केले जात होते. 31 डिसेंबरनंतर बँकांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा संस्थेचा पैसा असून तो सर्वसामान्यांच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...