आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची त्यांच्यात क्षमता आहे. क्रिकेटमध्ये संगमनेरचा अजिंक्य रहाणे यांनी मोठे नाव केले. आश्वीची पूनम खेमनर हिची आयपीएल संघात निवड झाली, हे अभिमानास्पद आहे. राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या स्पर्धेचा लौकिक राज्यात वाढत आहे. खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. या स्पर्धेत राज्यातील खेळाडू सहभागी होतील, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नामदार चषक २०२३ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आमदार थोरात बोलत होते.
कांचन थोरात, डॉ. जयश्री थोरात, उद्योगजक राजेश मालपाणी, डॉ. हसमुख जैन, के. के. थोरात, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, शतानंद खामकर, निखिल कातोरे, अजय फटांगरे, गोरख कुटे, योगेश भालेराव यावेळी उपस्थित होते. घुलेवाडीच्या साई छत्रपती राहुल राऊत इलेव्हन संघाने नामदार चषक पटकावला. अंतिम सामन्यात घुलेवाडी येथील साई छत्रपती राहुल राऊत ११ संघाने वडगावपानच्या आयुष्य संघावर १ धावेने मात केली. घुलेवाडी संघाने ६ षटकात ५८ धावा तर आयुष्य संघाला ५७ धावा केल्या. घुलेवाडीच्या अमोल दुबे याने गोलंदाजी व फलंदाजीत कौशल्य दाखवत ''मॅन ऑफ द मॅच'' पुरस्कार मिळवला.
घुलेवाडी संघाला १ लाख २१ हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तर संघ मालकास पल्सर गाडी देण्यात आली. उपविजेत्या संघासह तृतीय व चतुर्थ संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, खेळाडू, संघ व सर्वाधिक षटकार, विकेट हॅट्रिक, निर्धाव षटक टाकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.