आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांना मिळणार आमरस:साईभक्ताच्या 5,000 किलो केशर आंब्याच्या देणगीतून शिर्डीमध्ये भक्तांना दोन दिवस आमरस प्रसाद भोजन

शिर्डी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी साईभक्त दीपक नारायण करगळ यांनी स्वत:च्या मालकीच्या केशर आंब्यांच्या आमराईत सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले ५,००० किलो केशर आंबे शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयाला देणगी म्हणून दिले.

त्यातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस साईभक्तांना, दोन्ही रुग्णालयांतील रुग्णांना आणि अनाथाश्रम, वृद्धाश्रमात या आंब्यांच्या रसाचे प्रसाद भोजन देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. गेल्या २-३ वर्षांपासून दीपक करगळ केशर आंबे संस्‍थानला देणगी स्वरूपात देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...