आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण समारंभ:सृजन भजन महास्पर्धेत  मुंबईचे साई प्रासादिक भजनी मंडळ प्रथम

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिवसांपांसून प्रतीक्षा असलेली ‘अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धा -२०२२’ च्या चौथ्या पर्वाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच भक्तिमय वातावरणात बारामतीत झाला. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून या भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुंबईच्या साई प्रासादिक भजनी मंडळाने स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. शिरसाई प्रासादिक भजनी मंडळ, पुणे यांनी द्वितीय, तर सूरताल भजनी मंडळ कोकण यांनी तिसरे पारितोषिक पटकावले.

यंदा प्रथमच देशपातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातून एकूण १२०० पेक्षाही अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. आबा परकाळे, सुनील काटे, ज्ञानपर्व संस्थेचे अरुण काशीद, विद्या काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत माऊली सावंत, श्रीधर भोसले, रामेश्वर डांगे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धेत कर्जत-जामखेड गटातून स्वरविहार भजनी मंडळ (कर्जत) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पवनसुत भजनी मंडळ (जामखेड) यांनी द्वितीय तर मुक्ताई भजनी मंडळ (कर्जत) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर दक्षिण विभाग या गटात नादलहरी भजनी मंडळ (तामिळनाडू) यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. शारदा संगीत विद्यालय (गोवा) यांनी द्वितीय तर दीपा वादन विद्यालय संगीत आणि सांस्कृतिक कला मंच (कर्नाटक) यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले.

बातम्या आणखी आहेत...