आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेसाठी साई उन्हाळे हीच निवड

जामखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होणारया विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेसाठी साई भाऊसाहेब उन्हाळे हीची निवड झाली. अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालयाची साई ही विद्यार्थिनी आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत साई उन्हाळे हिने मल्लखांबाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून यश मिळवले.

तिच्या या यशस्वी खेळामुळे पुणे विद्यापीठ विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. साई उन्हाळे हिला प्रशिक्षक गणेश वाळुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल प्राचार्य बी. एच. झावरे, प्रा. मगर, हराळे, नंंदेेश शिंंदे , निलेेश कुलकर्णी, गोडवळकर, शिंदे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...