आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा‎:शहरात संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार‎ महासंघ व चर्मकार समाजातील‎ विविध संघटनांच्यावतीने शहरात‎ शोभा यात्रा काढून संत शिरोमणी‎ रविदास महाराजांची जयंती उत्साहात‎ साजरी करण्यात आली.

अभिवादन‎ मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या‎ विचारांचा जागर करण्यात आला.‎ चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक‎ अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या‎ अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन‎ करण्यात आले. यावेळी आमदार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संग्राम जगताप, संघटनेचे उपाध्यक्ष‎ राजेंद्र बुंदेले, नगरसेवक डॉ. सागर‎ बोरुडे, सुनिल त्र्यंबके, भारुडकार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हमीद सय्यद, नीलेश बांगरे, विशाल‎ बेलपवार, बाबासाहेब तेलोरे, शोभा‎ कानडे, बाळासाहेब केदारे, शशिकला‎ झरेकर, विद्या वाघ, वंदना गायकवाड‎ आदी उपस्थित होते.‎ प्रारंभी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎ करून अभिवादन करण्यात आले.‎

त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली.‎ बॅंड पथकासह निघालेल्या शोभायात्रेत‎ मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला‎ सहभागी झाल्या होत्या. रथात संत‎ रविदास महाराजांचे तैलचित्र ठेवण्यात‎ आले होते. मार्केटयार्ड चौकातील डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा‎ येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास‎ पुष्पहार अर्पण करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...