आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामात जन्माला आले, नामात जीवन जगले. आयुष्यभर सर्वांना नाम देत देत नामावस्थेत विलीन झाले. सर्व संतांनी जगाच्या कल्याणाचा विचार केला, असे निरुपण पनवेलचे श्रीरामबुवा चितळे यांनी केले. बालिकाश्रम रोडवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना संस्थान मध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव प्रसंगी चितळे यांचे कीर्तन झाले.
त्यावेळी चितळे बोलत होते. यावेळी आनंद कुलकर्णी यांनी तबल्यावर, तर अनुजा कुलकर्णी यांनी हार्मोनिअमवर साथ संगत दिली. चितळे म्हणाले, आजकाल व्यवहार जास्तीचा पाळला जातो. अंतरीचे प्रेम कमी झाले आहे. येणारा काळ विचित्र असणार आहे. पूर्वी अथर्वशीर्ष, रामरक्षा,भीमरूपी, पुरूषसुक्त, पावकी निमकी दिडकी सगळे तोंडपाठ होते. आता सगळीकडे पाट झाले आहे. कारण आज पूर्वीसारखी वडीलधारी माणसे राहिली नाहीत. कोणत्याही प्रकारचा धाक राहिला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.