आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बोल्हेगावात गुटखा विक्री ; अन्न प्रशासन विभागाने कारवाई

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव उपनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात टपरीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत मावा व विविध कंपन्यांचा गुटखा असा २१ हजार १९६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुटखा विक्री करणाऱ्या गणेश बाळासाहेब कोलते (वय २३, रा. बोल्हेगाव) याच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांना बोल्हेगाव परिसरात गुटखा विक्रीबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोल्हेगाव परिसरातील शनैश्‍वर पान स्टॉलवर छापा टाकला. त्यांनी टपरीमध्ये केलेल्या तपासणीमध्ये मावा व विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला.

बातम्या आणखी आहेत...