आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलाची फसवणूक:जमिनीचे खरेदीखत होऊनही दुसऱ्या व्यक्तीला विक्री ; कोतवाली पोलिसात गुन्हा

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीचे खरेदीखत झालेले असतानाही ती दुसर्‍याला विक्री करून वकीलाची फसवणूक केलाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अ‍ॅड. गजेंद्र नानाजी दांगट (वय ३६, रा. नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुश्री सागर काबरा, सागर अशोक काबरा (दोघे रा. तापीदास गल्ली, आडतेबाजार), विवेक विठ्ठल त्र्यंबके (रा. ढोरगल्ली, जाधव मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी), रश्मी कमल चावला व कमल मनमोहन चावला (दोघे रा. सिंध्दी कॉलनी, तारकपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सागर काबरा व विवेक त्र्यंबके यांनी अ‍ॅड. दांगट यांना अनुश्री काबरा हिच्या नावावर असलेली वाळुंज (ता. नगर) शिवारातील जमीनीचे ७ सप्टेंबर २०२१ रोजी रजिस्टर साठेखत व जनरल मुखत्यारपत्र नोंदवून दिले. अ‍ॅड. दांगट यांनी रोख व धनादेश स्वरूपात अनुश्री व सागर काबरा यांना ८ लाख २१ हजार रूपये दिले होते. काबरा दाम्पत्यांनी अ‍ॅड. दांगट यांना सातबारा उतार्‍यास नोंद करून खरेदीखत त्यांच्या नावे लिहून दिले नाही. अ‍ॅड. दांगट यांनी वाळुंज तलाठी कार्यालयात अधिक चौकशी केली असता, त्यांना विक्री केलेली शेत जमीन सागर काबरा, अनुश्री काबरा व विवेक त्र्यंबके यांनी रश्मी कमल चावला व कमल मनमोहन चावला यांना सोबत घेवून स्वत:चे नावे खरेदी करून घेतली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अ‍ॅड. दांगट यांनी या मिळकतीचे आणखी काही व्यवहार झाले आहे का, याची माहिती घेतली असता वरील नमुद मिळकत ही अनुश्री काबरा व सागर काबरा यांनी सुभाष हस्तीमल कटारिया यांना २९ सप्टेंबर, २०२१ रोजी खरेदीखत करून विक्री केल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दांगट यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...