आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा सचिवपदी कीर्तनकार दिलीप महाराज साळवे यांची, तर शहराध्यक्षपदी अॅड. सुनील महाराज तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे व जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी या नियुक्त्या जाहीर करुन साळवे व तोडकर यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी सुनील सकट, भीमराव मुरुमकर, अमोल खडके, गोकुळ धाडगे आदी उपस्थित होते. अहमदनगर बार असोसिएशनच्या खजिनदारपदी निवडून आल्याबद्दल अॅड. तोडकर यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अखिल विश्व वारकरी परिषदचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते व इतर राज्य कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांनी दोघांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.