आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक ज्ञान:परम संगणक शिक्षणाच्या संशोधनासाठी समिरण जाेशी अमेरिकेला जाणार

कोपरगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक अभियंता समिरण जयंतराव जोशी अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक (सिटी) शहरातील युटा विद्यापीठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी रवाना होणार आहे. समिरण जोशी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे एएमडी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम पाहत आहे. संगणक क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधन क्रियेत सहभागी व्हावे, असे समीरणला नोकरीत असतांनाच वाटले आणि तेथून सुरु झालाय समिरणचा एक नवा प्रवास. समीरणचे संगणकाविषयी ज्ञान आणि संशोधक चिकित्सा पाहून त्याला अमेरिकेतील तिन विद्यापिठाने प्रवेशासाठी मागणी केली होती. त्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क जवळील रटगर्स विद्यापीठ,शिकागो जवळील नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठ आणि तिसरे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठ यांचा समावेश होता.या तिनही विद्यापिठाने समीरणचा शिक्षण आणि संशोधन खर्चाची तयारी दर्शवली. संगणक अभियंता समिरणच्या वाटचालीस स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करुन शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...