आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गावर थेट सीएनजी पाईपलाईन:अहमदनगर, शिर्डीला 24 तास मिळणार इंधन

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीएनजी इंधनासाठी एरवी महामार्गाच्या बाजूंना असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा समृद्धी महामार्गावर दिसणार नाहीत. समृद्धी महामार्गाजवळ थेट पाईपलाईन द्वारे सीएनजीची इंधन पुरवठा केला जाणार असल्यामुळे अहमदनगर व शिर्डीला 24 तास नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातीलनागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या मार्गावरील महत्वाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना कमी वेळात पोहोचता येणार आहे.

समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी 29.40 किलोमीटर असून, कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी 5 किलोमीटर अंतरावर तर अहमदनगर मुख्यालयाचे 110 किलोमीटर अंतरावर आहे.

राज्यातील बहुतांशी रस्ते व महामार्गावर सीएनजी इंधनाचे पेट्रोल पंप कमी संख्येने आहेत. त्यामुळे वाहन चालकांना सीएनजीचे इंधन भरण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. समृद्धी महामार्गावर थेट पाईपलाईन द्वारे पेट्रोल पंप चालकांना इंधनपुरवठा केला जाणार आहे. सध्या बहुतांशी पेट्रोल पंपावर टँकरच्या माध्यमातून सीएनजी इंधन पुरवले जाते. बऱ्याचदा वेळेवर टँकरचे इंधन मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालकांना सीएनजी इंधन नसल्याचे फलक देखील लावावे लागत होते.

शिर्डी व कोपरगाव या परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर व शिर्डीला 24 तास नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे. ​​​​​​

अहमदनगर जिल्ह्यात मोजक्याच पंपावर सीएनजी इंधन

अहमदनगर शहरात तीन सीएनजी पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील सीएनजी चे पेट्रोल पंप अत्यंत कमी प्रमाणात आहेत. समृद्धी महामार्गावर 24 तास सीएनजीचे इंधन उपलब्ध होणार असल्यामुळे जिल्ह्यातील वाहनचालकाबरोबरच इतर राज्यातून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना सीएनजी इंधनासाठी पंपावर रांगा लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

बातम्या आणखी आहेत...