आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार अणि दोषांचा भागाकार आहे, असे प्रतिपादन भिंगार येथील साई मंदिराचे पुजारी श्रीश देशपांडे यांनी केले.
भिंगार येथील स्पोकन इंग्लिश कोर्सच्या समारोप कार्यक्रमात बाल संस्कार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशपांडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने आणि प्रमाने वागणे, स्वच्छता राखणे, प्रतिदिनी शाळेत जाणे, घरकामात साहाय्य करणे या विषयांवर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
देशपांडे म्हणाले, शिक्षण आणि संस्कार दोन्हीही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत. संस्कार जीवनाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे जीवनाची उत्तुंग इमारत उभी राहणे शक्य होते. जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायची असेल तर तिला शिक्षण आणि संस्कार या दोन्ही चाकांची गरज आहे. शिक्षण या शब्दाच्या व्यापक अर्थाकडे पाहून विचार केला तर शिक्षणातून संस्कार होतात असा आभास होतो व संस्कारातूनही शिक्षण होत असल्याची जाणीव होते. सुत्रसंचालनशितल भुतकर यांनी, तर आभार अभिजित भुतकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.