आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल:प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 500 घरकुलांना मंजुरी ; श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांची माहिती

श्रीगोंदे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत श्रीगोंदे नगरपरिषदे मध्ये ५०० गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. यात नगरपरिषदेने पूर्वी २६५ नागरिकांना या योजनेतुन घरकुले मंजूर करून दिले होते आणि आता ५०० गरजू नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिली. नगराध्यक्ष पोटे म्हणाल्या, आजपर्यंत नगरपरिषदेने २६५ नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केले आहेत त्यांचे कामे जवळ जवळ पूर्ण होत आले आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या ५०० लाभार्थ्यांना पुढील आठवड्यामध्ये घरकुल मंजूर प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.

आजपर्यंत ज्या नागरिकांनी घरकुल मंजुरीसाठी कागदत्रे नगरपरिषदमध्ये दिले होते परंतु काही कारणास्तव ज्या नागरिकांचे नावे ७६५च्या यादी मध्ये नावे आलेले नाहीत आशा राहिलेल्या सर्व नागरिकांनी येत्या आठ दिवसांमध्ये खालील प्रकारचे तीन कागदपत्रे व घरकुल अर्ज नगरपरिषदमध्ये संबंधित विभागाकडे जमा करावेत यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, घरातील कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावरील जागेचा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची झेरॉक्स असे तीन कागदपत्रे व घरकुल अर्ज येत्या ८ दिवसांत नगरपरिषदमध्ये जमा करावेत यामुळे या योजनेसाठी कोणताही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पोटे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...