आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्गा:दर्गा दायरा येथील हजरत पीर सरकार शहा शरीफ यांचा सोमवारी संदल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हजरत पीर सरकार शहा शरीफ (रहे) दायरा, अहमदनगर यांचा संदल सोमवारी ( ९ जानेवारी) व उर्स मंगळवारी (१० जानेवारी) साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन शेख मोहम्मद साबीर लाड मोहम्मद यांनी दिली. नगर शहराला लागूनच असलेल्या दर्गा दायरा येथील सुप्रसिद्ध हजरत पीर सरकार शहा शरीफ (रहे) दर्गाचा संदल व उर्स ट्रस्टचे वतीने साजरा करण्यात येणार आहे.

सोमवारी पहाटे ४.३० वाजता पांरपरिक धार्मिक पद्धतीने दर्ग्यावर संदल लावून व फुलांची चादरी अर्पण केली जाईल. धार्मिक फातेहा पठण करून नारीजा व शेरणी प्रसादाचे वाटप केले जाईल, तसेच मंगळवारी उर्स साजरा केला जाईल. कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी, तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करून संदल व उर्स साजरा केला जाईल, असे ट्रस्टचे चेअरमन शेख मोहम्मद साबीर लाड मोहम्मद, विश्वस्त ॲड. शेख हाफिज एन. जहागिरदार, शेख निजाम शरीफमियाँ, डॉ. सय्यद समीर शहा महेमूद, शेख नौशाद बाबामियाँॅ, सय्यद अत्तामियाँ पाशामियाँ व सय्यद साबीर दरवेशमियाँ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...