आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक, विकास मंडळाच्या पदाची निवड बिनविरोध:बँकेच्या अध्यक्षपदी संदीप मोटे, उपाध्यक्षपदी कैलास सारोक्ते

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्रीगोंद्याचे संचालक संदीप मोटे यांची तर उपाध्यक्षपदी अकोल्याचे संचालक कैलास सारोक्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बँकेच्या सभागृहामध्ये जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. संदीप मोटे यांच्या नावाची सूचना चोपडे रामेश्वर यांनी मांडली तर अनुमोदन सरस्वती घुले यांनी दिले. तसेच कैलास सारोक्ते यांच्या नावाची सूचना अण्णासाहेब आभाळे यांनी मांडली तर अनुमोदन निर्गुणा बांगर यांनी दिले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. या निवडी प्रसंगी नूतन संचालक भाऊराव राहींज, महिंद्र भणभने, सूर्यकांत काळे ,शशिकांत जेजुरकर ,योगेश वाघमारे, बाळू सरोदे ,संतोष कुमार राऊत, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, रमेश गोरे, बाळासाहेब तापकीर, माणिक कदम ,शिवाजी कराड, कारभारी बाबर व ज्ञानेश्वर शिरसाट उपस्थित होते.

निवडीपूर्वी सकाळी आठ वाजता गुरुमाऊली मंडळाच्या कोअर कमिटीची सभा झाली. त्यात मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते सर्व संचालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर विचार विनिमय करून सर्वानुमते या निवडी निश्चित करण्यात आल्या.गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, आदी उपस्थित होते.

जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगावचे विश्वस्त विलास गवळी, उपाध्यक्षपदी संगमनेरचे विश्वस्त संजय शेंडगे, खजिनदारपदी पाथर्डीच्या विश्वस्त सुवर्णा राठोड तर सचिवपदी नेवासाचे विश्वस्त संतोष मगर यांची निवड घोषित करण्यात आली.

विकास मंडळाचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. त्यांना विकास मंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र आढाव यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी केले. शेवटी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...