आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप निचित यांची बदली:वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची मंत्रालयात बदली झाली असून, सोमवारी (29 ऑगस्ट) ला निचित यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी म्हणून संदीप निचित यांनी काम पाहिले होते. त्यानंतर अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर देखील काही काळ त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली होती. कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेवून काम केले होते. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता, औषधाची कमतरता भासत असताना या कालावधीत सर्व विभागाशी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम निचित यांनी केले होते.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी असताना निचित यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी अभिनव उपक्रम राबवला होता. गेल्या तीन वर्षापासून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून अहमदनगरमध्ये ते काम करत होते. त्यांची बदली मुंबईत मंत्रालयात झाली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात विशेष कार्य (ओएसडी) म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

बातम्या आणखी आहेत...