आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारपणानंतर सक्रिय बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर हल्लाबोल:सुंदर भाषणे ऐकून पोट भरत नाही, शेतकऱ्यांचे दुःख कोण जाणणार?

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेणारे या सरकारमध्ये कोणी नाही. त्यांना केवळ सुंदर भाषणे करता येतात. मात्र भाषणे ऐकून पोट भरत नाही, ही वस्तुस्थिती असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनात आजारपणानंतर सक्रिय झालेल्या बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल चढवला.

संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. आजारपणानंतर थोरात प्रथमच थेट रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते. भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते. तर ठाकरे गटाने मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे, हे विसरून चालणार नाही, असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

ही वस्तुस्थिती

बाळासाहेब थोरात म्हणाले, सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कोण? असा सवाल विचारण्याची वेळ आता आली आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेणारे या सरकारमध्ये कोणी नाही. शेतकऱ्यांकडे लक्ष देणारे कोणी नाही. भाषणे मोठी करतात, सुंदर भाषणे करता येतात. त्यांची भाषणे फक्त ऐकावी. मात्र भाषणे ऐकून पोट भरत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

आता शेतकरी दुय्यम स्थानी

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकार व आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेड कडून कुठेही खरेदी सुरू नाही.

बातम्या आणखी आहेत...