आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा तपास:संगमनेरला इंजिनिअरिंग कॉलेजच्या बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या संकेत सुरेश नवले (वय २२, नवलेवाडी, तालुका अकोले) या विद्यार्थ्याचा तालुक्यातील सुकेवाडी रोडवरील पुनर्वसन कॉलनी जवळ शुक्रवारी मृतदेह आढळला. त्या विद्यार्थ्यांची हत्या की आणखी काही याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संकेत नवले संगमनेरमध्ये रूम घेऊन राहत होता. आठ दिवसापासून कॉलेजला सुट्टी आहे.

मात्र, त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी पाहिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत तरुणाची ओळख पटण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत फोटो व्हायरल केला. नवलेच्या मित्रांनी फोटो पाहिल्यावर पोलिस ठाणे गाठत हा मृतदेह संकेत नवले याचा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांना कळविले. संकेतचे वडील शिक्षक आहेत. संकेतचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार आहे. मात्र, त्याच्या डोक्याला धारदार शास्त्राने वार झाल्याच्या मोठ्या जखमा होत्या. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रात्री उशिरा शहर पोलिस खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...