आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर बळी पडणार नाही ; सोमेश्वर दिवटे

संगमनेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून जागेचे नियोजन केले आहे. लवकरच शहरात भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. भाजप पदाधिकारी जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली.

भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, माजी उपनगरध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी पालिकेत सत्ता दिल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा उभारू असे म्हटले आहे.यावर दिवटे म्हणाले, ॲड. गणपुले व जहागीरदार यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून सत्ता दिली. गणपुले नगरसेवक असताना राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र, त्यांना म्हाळुंगी नदीवर साधा पूल उभारता आला नाही. निवडून आलेल्या प्रभागात एकही काम केल नाही. जहागिरदार यांनी तर प्रत्येक वेळी वार्ड बदलला.

त्यांनी चांगले काम न केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड त्यांच्या कामातून पाच वेळा निवडून आले. एकदा बिनविरोध झाले. तेव्हा कामांबाबत भाजपने थापा मारू नये. आमदार डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना महात्मा ज्योतिराव फुले, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची उभारणी केली. याबाबत प्रसिद्धी केली नाही. भूलथापा मारण्याची भाजपची पद्धत आहे.

काँग्रेसच्या बळावर उपनगराध्यक्ष झालेले जहागीरदार गद्दारी करून लोकांपुढे येत आहेत. यामुळे संगमनेरकर भूलथापांना बळी पडणार नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर विकास कामातून वैभवशाली ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...