आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा:संजीवनी कॉलनीला पटलेय सौर ऊर्जेचे महत्त्व ; नागरिकांचा सन्मानपत्र देऊन गौरव

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौरऊर्जा ही अनंत, मोफत व पर्यावरणपूरक असल्यामुळे तिचा वापर करणे ही काळाची गरज आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौरऊर्जेच्या वापराकडे शासनाने देखील लक्ष केंद्रित केले आह, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शहरातील संजीवनी कॉलनी येथील ७० टक्के रहिवाशांनी सोलर वॉटर हीटर बसविल्याने त्यांचा हरिभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आमदार जगताप यांच्या हस्ते पर्यावरण मित्र सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

वाढत्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या पाहत आहोत. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. हे सर्व वेळीच रोखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. संजीवनी कॉलनीतील रहिवासी मीनाबाई गुगळे, सुशीलाबाई चुडीवाल, दिपीका चांडक, वसुधा जोशी, माधुरी मते, संध्या दुर्गुळे, सुरभी बिनायके हे सदस्य सोलर वॉटर हीटर संयंत्र वापरत आहेत, ही बाब कौतुकास्पद असून अनुकरणीय देखील आहे, असे ते म्हणाले.

शहरातील इतर सोसायटी वसाहती यांनी देखील अशा प्रकारे सौरऊर्जेचा वापर वाढवणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कॉलनीतील इतर सदस्यांना देखील सोलर वॉटर हिटर बसविण्यासाठी प्रोत्साहित करुन संजीवनी कॉलनी ही शंभर टक्के सौरऊर्जा वापरणारी कॉलनी, अशी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी हरीभुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी सांगितले.संजीवनी कॉलनीत गेल्या दोन वर्षापासून झाडांचे संगोपन व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या प्रशांत मते व राजेंद्र बळे यांचा यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षमित्र सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कॉलनीचे ज्येष्ठ दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...