आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सला सोशल इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित

काेपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी अशा विविध संस्थांनी अद्ययावत ज्ञानाच्या क्षेत्रात करीत असलेल्या भरीव कामगीरीबध्दल व परिणामी अद्ययावत ज्ञानाधिष्ठीत नवतरुण-तरुणी तयार करीत असल्याबध्दल संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा यूएसए स्थित कोर्सेरा या मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (मुक्स) या प्रदाती कंपनीने सोशल इम्पॅक्ट या पुरस्कारने दिल्ली येथे सोहळ्यात गौरव केला. कोर्सेराचे सीईओ जेफ मॅगिओनकाल्डा यांच्या हस्ते संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व डाॅ. ए. बी. पवार (डीन अकॅडमिक्स) यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. कोर्सेराचे व्यवस्थापकीय संचालक दुलेस कृष्णन, मल्लव आचार्य आणि शुभांगी सुद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल अमित कोल्हे यांनी त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कोर्सेराच्या कोर्सेसमुळे ज्यांनी ते पूर्ण केले, त्यांना खूप फायदा झाला. म्हणून आता संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सने कोर्सेरा सोबत सामंजस्य करार केला. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणावर ओपन ऑनलाईन कोर्सेसला अभ्यासक्रमाचा एक भाग बनवण्याची संकल्पना मांडली. त्यामुळे संजीवनी लवकरच करीअर अकॅडमी सुरू करणार आहे. या व्यासपीठाद्वारे सध्या उद्योग जगताला अपेक्षित असणारे मनुष्यबळ मिळण्यास तसेच अनेकांना अधिकचे प्रभुत्व मिळविण्यास मदत होणार आहे, असे अमित कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...