आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:संजीवनी सैनिकी स्कूलमधून देशाचे आदर्श नागरिक घडावेत

कोपरगाव शहर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे, त्यांच्या प्रती देश भक्तीची भावना वाढीस लागवी, सैनिकी अधिकारी बनावे, जर सैनिकी अधिकारी नाहीच होता आले तरी कोठेही आपले प्रामाणिक काम करून देशाची सेवा करावी, या हेतुने सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजची स्थापना केली. त्यांच्या विचारधारेची काटेकोर अंमलबजावणी करून येथून देशाचे आदर्श नागरिक घडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या २२ व्या स्थापना दिन स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालय व हाॅस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सचिव ए. डी. अंत्रे, स्कूल डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर उपस्थित होते. सुुरुवातीस सरस्वतीची मूर्ती व कै. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

कोल्हे म्हणाले, मागील २२ वर्षांपासून चांगल्या शिक्षकांची टीम येथे कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले विद्यार्थी येथे घडले आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या स्पर्धा बघता एनडीए, जेईई, एनईईटी अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले जातील.

डाॅ. पवार म्हणाले, येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भाग्यवान आहेत. आपले कार्यकर्तृत्व एवढे खुलवा की त्यासाठी मिळालेली शिस्त व ज्ञान हे संजीवनी मधुन मिळाले असे अधोरेखित झाले पाहिजे. ए. डी. अंत्रे म्हणाले, विद्यार्थ्यांचे करीअर घडविण्यासाठी संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांमध्ये भरपुर संधी आहेत. सुत्रसंचलन शिक्षक आण्णासाहेब थोरात यांनी, तर आभार नाना वाघ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...