आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीन कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवरील जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. कोईमतूर येथील सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने दिलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन. विजयन नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बिपिन कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केला आहे.

या संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा याप्रसंगी म्हणाल्या, पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचे वतीने दिला जाणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनांबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करून देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीन कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धडक कृती विकास कार्यक्रम राबवले. ऊस संशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे उस बेणे सभासदांसह शेतकऱ्यांना उपलब्ध करून कमी पाण्यांत, कमी श्रमात अधिक उस उत्पादन कसे मिळेल, यावर सातत्यांने भर दिला आहे.

बिपीन कोल्हे म्हणाले, सध्या ऊस उतारा आधारीत दर दिले जात असल्याने प्रति हेक्टरी उस व साखर उतारा देणाऱ्या उस जातींची गरज आहे. त्यासाठी उस संशोधन केंद्र कोईमतूर संस्थेने को ७२१९, को ८६०३२ सारख्या उस जाती विकसित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ब्राझीलमध्ये १५ टक्के साखर उतारा देणाऱ्या ऊसाच्या जाती विकसित झाल्या आहेत, त्या भारतात झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल. ऊस संशोधनात कोईमतुर संस्थेने उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

साखर उद्योगातील भरीव योगदान बद्दल शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतुर यांनी जो सन्मान केला आहे. तो व्यक्तिगत माझा नसून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...