आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:726 दिव्यांनी उजळले संत ज्ञानेश्वर मंदिर

नेवासे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळयानिमित्त माऊलीची कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीतील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मंगळवारी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत ७२६ दिवे लावण्यात आले. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले होते.मंगळवारी पहाटे समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. संत ज्ञानेश्वर मंदिराचे शिवाजी महाराज देशमुख यांनी “पैस” खांबाचे पूजन केले.

पैस खांबासह माऊलीसमोर पहिला दीप लावण्यात आला. तदनंतर ॐ आकाराच्या बनवण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर सुधीर फडके, डॉ. दिलीप पडघन, रमेश आनंदगिरी महाराज, गोपाल आनंदगिरी महाराज ,कृष्णाजी महाराज, विवेकानंद आश्रमचे ज्ञानेश्वर महाराज, गायिका शिल्पा पुणतांबेकर, निवेदिका मेघना अभ्यंकर, तबला वादक तुषार अग्रे, डॉ.घुले, महेश मापारी, डॉ.संजय सुकाळकर, व सर्व विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप पेटवून तो संत ज्ञानेश्वर मंदिरावर व मंदिरांचे पायऱ्यांवरही दीप लावण्यात आले. आळंदी येथे संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना माऊलीची कर्मभूमी असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस” खांबास पहिला दीप अर्पण करून मंदिरावर ७२६ दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले.

दीपोत्सवाचा हा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक भाविक या वेळी सेल्फी काढण्यात दंग होते. संजीवन सोहळ्याच्या या दीपोत्सवानिमित् प्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी गायन सेवा ज्ञानेश्वरांचे पैसे खांबा समोर अर्पण केली.

बातम्या आणखी आहेत...